मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
भाजपचे खा . जयसिद्धेश्वर महास्वामी यांचा जातीचा दाखला रद्द झाल्यास आपण सोलापर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी सांगितले . पंढरपूर येथे मंगळवारी संतांचा मेळावा होणार आहे .
याची माहिती देण्यासाठी माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी पंढरपुरातील विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला . ढोबळे म्हणाले , खा . जयसिद्धेश्वर महास्वामी यांचा जातीचा दाखला रद्द झाल्याबाबतच्या चर्चा कानावर येत आहेत . परंतु , खा . जयसिद्धेश्वर स्वामी उच्च न्यायालयात जाणार आहेत .
या प्रकरणात अपिलावर अपील होणार आहे . यामुळे हे प्रकरण शिथिल होणार आहे . जर निवडणूक लागण्याची वेळ आली तर पक्षाने आदेश देताच आपण सोलापूर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज