मंगळवेढा येथील प्राथमिक शिक्षक व शिक्षक संघटना यांच्यावतीने सांगलीतील पूरग्रस्तांसाठी २ हजार ५०० साड्या, ३०० पँन्ट शर्ट, ५०० मुला -मुलींचे ड्रेस, स्वेटर ५० चादरी व शाली साहित्य देण्यात आले.
आस्मा कमाल आतार बालविकास प्रकल्प अधिकारी सांगोला यांच्या संकल्पनेस व महिला आघाडी अध्यक्षा प्राथमिक शिक्षक समिती मंगळवेढा सौ.ज्योती सचिन कलुबर्मे यांच्या आवाहानास प्रतिसाद देत सर्व शिक्षक शाळांनी मदत केली.प्राथमिक शिक्षक समिती महिला आघाडी मंगळवेढा, शिक्षक समिती शाखा मंगळवेढा, महिला भगिनी व ग्रामस्थ शिवाजीनगर मंगळवेढा, जि.प.प्राथ.शाळा शिवाजीनगर विद्यार्थी, पालक व शिक्षक मंगळवेढा, शिवपार्वती कलेक्शन मंगळवेढा, शिवाजी नगर युवक मंडळ, मंगळवेढा, प्राथमिक, माध्यमिक , शिक्षकवृंद मंगळवेढा, ग्रामस्थ मंगळवेढा, वरील सर्व संघटना,मंडळ यांचे अध्यक्ष, सरचिटणीस पदाधिकारी यांच्या वतीने सांगली येथील पूरग्रस्तांना मदत म्हणून २ हजार ५०० साड्या, ३०० पँन्ट शर्ट, ५०० मुला -मुलींचे ड्रेस, स्वेटर ५० चादरी व शाली व्यवस्थित पँकिंग करुन देण्यात आले.
सदर मदत योग्य व गरजू पुरग्रस्तांच्या हाती पोहोचवण्याचे आदम खाजासाहेब मणेरी नंदेश्वर, अल्लाउद्दीन तांबोळी, रफिक तांबोळी,कोळा यांनी आश्वासन दिले. आज सकाळी हे सर्व कपडे सांगली कडे रवाना करण्यात आले .
यावेळी प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अनिलबापू कादे ,शिक्षक नेते सुरेश पवार , महिला व बालकल्याण अधिकारी असमा आतार ,तालुकाध्यक्ष विठ्ठल ताटे , महिला अध्यक्षा सौ.ज्योती कलुबर्मे व समितीचे सर्व पदाधिकारी शिवाजीनगर मधील महिला भगिनी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज