
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघात अनेक सहकारी संस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक चळवळ उभा केली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी पाणी संघर्ष चळवळ उभा करून पंढरपूर – मंगळवेढा तालुक्याच्या विकासाला चालना देण्याचे काम रुजवले आहे. असे मत काँग्रेसचे प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी केले आहे.

विधानसभा निवडणूकीनिमित्त मंगळवेढा तालुक्यातील हाजापुर, जालिहाळ, सिध्दनकेरी, रड्डे, नंदेश्वर, खडकी, पडोळकरवाडी, लोणार, महमदाबाद हु, मानेवाडी, रेवेवाडी, हुन्नूर, भोसे आदी गावभेटीचा दौरा सोमवार दि.14 ऑक्टोबर रोजी करण्यात आला. याप्रसंगी काँग्रेसचे उमेदवार प्रा.काळुंगे बोलत होते.
मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील गावांना उजनी व म्हैसाळ योजनेतून पाणी उपलब्ध करून देणे हे आपले प्रमुख ध्येय असल्याचे सांगून प्रा. काळुंगे म्हणाले की, मंगळवेढा तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी असून नदीकाठची व उजनी लाभ क्षेत्रातील काही गावे वगळता तालुक्याच्या दक्षिण व पश्चिम भागातील अनेक गावे पावसाळ्यातदेखील पिण्याच्या पाण्यासाठी वर्षानुवर्षे तडफडत आहेत. परंतु याकडे राजकर्त्यांचे कायमच दुर्लक्ष झाले आहे.
प्रा.शिवाजीराव काळुंगेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेसमध्ये प्रवेश
नंदेश्वर येथील प्रचार सभेत युवा कार्यकर्ते युवराज बंडगर,ज्ञानेश्वर गरंडे, सिद्धेश्वर वाघमोडे यांनी काँग्रेसचे प्रा.शिवाजीराव काळुंगे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करून त्यांना निवडणुकीसाठी पाठिंबा दिला.
याभागाला पाणी शेतीला पाणी मिळण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे त्यासाठी पाणीसंघर्ष चळवळीच्या माध्यमातून सातत्याने गेल्या वर्षी दुष्काळी मंगळवेढा तालुक्याला पाणी मिळावे यासाठी 1993 सालापासून मा.क्रांतीवीर नागनाथ आण्णा नायकवडी यांचे नेतृत्वाखाली आ. भाई गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली, स्व. आर. आर. पाटील, मा.डाॅ.भारत पाटणकर यांचेबरोबर कृष्णा खोऱ्यातील 13 दुष्काळी तालुक्याची पाणीसंघर्श चळवळ उभी राहिली. तिचा गेली 27 वर्ष मंगळवेढा तालुक्याचा अध्यक्ष म्हणून कार्यरत असून 26 जून 2018 ला मंगळवेढा येथे भव्य रौप्यमहोत्सवी पाणीपरिषद घेऊन सरकारचे पाणीप्रश्नांकडे लक्ष वेधले तसेच मंगळवेढा तालुक्यातील उजनीच्या पाण्याचा प्रश्न महत्वाचा असून तालुक्यातील सुमारे ९० हजार एकराकरिता साडेसहा टी एम सी पाणी मंजूर असतानाही अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचले नाही.
त्यामुळे उजनीची अपूर्ण कामे पूर्ण करणे, कॅनॉलसाठी अधिग्रहण केलेल्या जमीनधारकांना त्या क्षेत्राचा अद्याप न मिळालेला मोबदला मिळवून देऊन कामे सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे, पाणी संघर्ष चळवळीच्या माध्यमातून तालुक्याच्या हद्दीवर प्रवेश केलेल्या म्हैसाळ योजनेतील पाण्याचा लाभ दक्षिण भागातील गावास मिळवून देऊन त्या पाण्यातून तलाव भरून घेणे, ३५ गावासाठी असणारी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस निधी मिळवून योजना पूर्ण करणे, भीमा व माण नदीला कॅनॉलचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणे, दुष्काळाचे कायमस्वरूपी निर्मूलन करणे, माण, भीमा नदीत बॅरेजेस बांधणे आहे.उजनी उजवा कालवा, म्हैसाळ 6वा टप्पा, पौट, पाठखळ, खुपसंगी साठवण तलाव, तामदर्डी बंधारा यासाठी निधी मिळविण्याचा प्रयत्न ही कामे प्रामुख्याने होण्यासाठी आपला मुख्य अजेंडा राहणार आहे.
समाजात आर्थिक सुबत्ता यावी, समाजासाठी काहीतरी करावे या भावनेतून धनश्री पतसंस्थेचे व मल्टीस्टेटचे रोपटे लावले. त्याचा आज विस्तार मोठया प्रमाणत झाला आहे. संस्थेच्या माध्यमातून अनेक गोरगरीब गरजू, छोटे मोठे उद्योजक यांचे संसार उभे केल्याने त्यांचे आशीर्वाद आपल्यामागे उभे आहेत. 1967 पासून काँग्रेसमध्ये सक्रिय झालो काँग्रेस पक्ष ,त्याची ध्येयधोरणे, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर असलेली निष्ठा यामुळे आपल्याला सातत्याने काँग्रेसचे 20 तालुकाध्यक्ष म्हणून काम करण्याचा बहुमान मिळाला तसेच, जिल्हा उपाध्यक्षपदी सध्या कार्यरत आहे.
आपला शेवटचा पक्ष मानीत आपण काँग्रेसशी एकनिष्ठ राहिल्याने आपल्याला विधानसभा निवडणुकीचे तिकीट पक्षाच्या वरिष्ठांनी दिलेले आहे. विरोधकांनी केलेल्या अफवावरती विश्वास न ठेवता आपण सर्व मतदारांनी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहवे असे आवाहन त्यांनी केले.याप्रसंगी राजाराम सावंत, वसंत गरंडे ,अक्षय टोमके, परमेश्वर घुले, शिवाजी काळे आदीनी आपले मनोगत व्यक्त केले. विविध गावातील संस्थेचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, सरपंच, उपसरपंच, कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंगळवार दि. 15 ऑक्टोबर रोजी निवडणूकीच्या प्रचारार्थ माळेवाडी, हुलजंती, पौट, येळगी, सोड्डी, शिवणगी, आसबेवाडी, सलगर खु, लवंगी, सलगर बु, मरवडे या ठिकाणी सभा आयोजित केल्या आहेत.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












