मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील मारापुर येथील मंडल अधिकारी यांच्या मनमानी कारभाराची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी या मागण्यांसाठी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने प्रांत अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
मारापुरचा मंडल अधिकारी हा गावातील गाव पुढाऱ्यांना हाताशी धरून मनमानी कारभार करत आहे. गावातील शेतकरी, विद्यार्थी या मंडल अधिकार्यांकडे कामा निमित्त गेले असता त्याच्या कडुन पैशाची मागणी केली जाते.
त्याच बरोबर त्याच्या कडुन आरेरावीची भाषा वापरली जाते. त्यामुळे त्या अधिकार्याची लवकरात लवकर चौकशी करून त्याच्या वर योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने प्रांत कार्यालया समोर अमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता मात्र प्रशासनाने कोणहीती कार्यवाही केली नसल्याने उपोषण सुरू करण्यात आले.
यावेळी छावा संघटना तालुकाध्यक्ष सुरज फुगारे, अक्षय पवार,येताळा खरबडे, अरुण मेटकरी,सुरेश मरीआईवाले, नवनाथ मेटकरी, रणजित नागणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज