मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
पुणे येथे नुकत्याच झालेल्या गुरु अबॅकस च्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत गुरू अबॅकस मंगळवेढा – पंढरपूर च्या विद्यार्थ्यांना घवघवीत यश संपादन केले.
नॅशनल फर्स्ट लेव्हल स्पर्धेत विश्वजीत गणेश यादव यांने भारतातून पहिला येण्याचा मान मिळविला आहे, विश्वजीत विनायक ढेकळे यांने भारतातून दुसरा येण्याचा मान मिळविला आहे. नॅशनल ज्युनियर लेव्हल स्पर्धेत गौरी नितीन मोरे हिने भारतातून तिसरी येण्याचा मान मिळविला आहे. तसेच गुरु अबॅकस मंगळवेढा व पंढरपूर शाखेचे प्रमुख गणेश सुनिल मेटकरी यांना बेस्ट ट्रेनर आॅफ दि ईयर अवार्ड ने सम्मानित करण्यात आले.
रविवार दि. ११/०८/२०१९ रोजी महालक्ष्मी लान्स, नगर रोड, खराडी बायपास जवळ, लोहगांव वाघोली नाका, पुणे येथे गुरू अबॅकस आयोजित राष्ट्रीय अबॅकस स्पर्धा- २०१९ घेण्यात आली. या स्पर्धेत विविध राज्यांतील ( मध्यप्रदेश, कर्नाटक, आसाम, महाराष्ट्र व इ.) स्पर्धक स्पर्धास आले होते. तसेच महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्य़ातील स्पर्धक ही आले होते. या स्पर्धेसाठी ६ मिनिटांत १०० प्रश्न पूर्ण करणे अनिवार्य होते. या अंतर्गत सकाळच्या सत्रात स्पर्धा झाली तर दुपारच्या सत्रात निकाल घोषित करून मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरू अबॅकसचे मॅनेजिंग डायरेक्टर महेंद्र गिरी, शुभांगी मॅडम तर प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री स्वागता शहा उपस्थित होते. कार्यक्रमात दीपप्रज्वलन शुभांगी मॅडम यांनी करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. या स्पर्धेत जी ६ मिनिटांची वेळ देण्यात आली होती.
त्या मध्ये नॅशनल फर्स्ट लेव्हल मध्ये विश्वजीत गणेश यादव यांने ४ मिनिटे ५४ सेकंदात, विश्वजीत विनायक ढेकळे यांने ४ मिनिटे ३० सेकंदात, नॅशनल ज्युनियर लेव्हल स्पर्धेत गौरी नितीन मोरे हिने ५ मिनिटे ५४ सेकंदात १०० प्रश्न पुर्ण केले.
तसेच विशाखा विनायक ढेकळे भारतातून ६ वी, कृष्णा अमोल सातपुते भारतातून ८वा, शंतनु संतोष फटे १० वा, सार्थक काळेल व सुमित दुधाळ १४ वा, अनुष्का मोरे, तनया मोरे १४ वी आली. वरिल सर्व विद्यार्थ्यांची गूरू अबॅकस मंगळवेढा व पंढरपूर शाखेकडून हार्दिक अभिनंदन.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज