मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । पंचायत समितीच्या माजी उपसभापतींच्या हुलजंती येथील शेतामधील विहीर व बोअरवरील ५५ हजारांचे विविध साहित्य अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे.
दरम्यान अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे . फिर्यादी बाळासाहेब शिंदे ( रा . माचणूर ) यांची हुलजंती येथे शेतीत विहीर व बोअर असून तेथे जवळच पत्र्याची खोली आहे . त्यामध्ये ५ हजार रुपये किमतीचे लोखंडी फण यंत्र , ४ हजार रुपये किमतीचे स्क्रिन फिल्टर , २० हजार रुपये किमतीचे २० पी . व्ही . सी . पाइप , १० हजार रुपये किमतीचे ५ एच . पी . पाणबुडी इलेक्ट्रीक मोटर , ८ हजार रुपये किमतीचे इलेक्ट्रीकल स्टार्टर , ६ हजार रुपये किमतीचे एम . एस . बॉक्स , २ हजारांची २ हजार फूट केबल असा एकूण ५५ हजारांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे फिर्यादी शिंदे यांनी म्हटले आहे.
दरम्यान सलगर येथे एकाच रात्री तीन चोऱ्या झाल्याची घटना ताजी असताना हुलजंतीत पुन्हा चोरी झाल्याने शेतकरीवर्ग भयभीत झाला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज