मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
ऊसतोड कामगार असलेल्या पती-पत्नीत घरगुती कारणावरून वाद झाला. याच वादातून पतीने काठीने मारहाण केल्याने पत्नीचा मृत्यू झाला आहे. ही घटना चिंचपूर (ता. दक्षिण सोलापूर) येथे घडली. या घटनेनंतर पतीने पत्नीस ऊस तोडत असताना चक्कर येऊन पडल्यामुळे मृत्यू झाल्याचा बनाव केला.
पोलिसांच्या चौकशीतून तसेच शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालामुळे पतीचा डाव फसला. सामका कृष्णा राठोड (वय 20, रा. कोठाळ, सोनपेठ, जि. परभणी) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून याप्रकरणात पती कृष्णा राठोड (वय 25) यास पोलिसांनी अटक केली आहे.
सामका आणि कृष्णा राठोड हे दांपत्य ऊसतोडीसाठी सोलापुरात आले होते.त्यांची ऊसतोड कामगारांची टोळी चिंचपूर (ता. दक्षिण सोलापूर) येथील शिवराया कोणदे यांच्या शेतात काम करीत होती. दोघा पत्नी-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून नेहमीच वाद व्हायचे. शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास पती-पत्नीमध्ये वाद झाला. या रागातून चिडून पती कृष्ण राठोड याने पत्नी सामका हिच्या डोक्यात काठीने जोरात मारले. काठीचा मार जोरात बसल्याने पत्नी सामका हिचा जागीच मृत्यू झाला.
यानंतर पत्नी समका ही अचानक चक्कर येऊन पडल्याचा बनाव कृष्णा याने केला. तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. सामका हिची तपासणी केल्यानंतर उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. यानंतर सामका हिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या वेळी मंद्रूप पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप धांडे यांनी कृष्णा राठोड याची अधिक चौकशी केली. कृष्णा याने काठीने मारून पत्नीचा खून केल्याची कबुली दिली आहे. यानंतर पोलिसांनी कृष्णा याला अटक केली असून सोमवारी न्यायालयात हजर करणार असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक धांडे यांनी सांगितले

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज