मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील एका 32 वर्षीय विवाहितेवर दोघांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित तरुणीने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर तीन जणांवर बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, या आरोपींपैकी विशाल गिरे आणि राहुल सोनावणे या दोघांनी पीडितेला सोमवारी फोन करून शय्यासोबत करण्यासाठी फोन केला होता.त्याच रात्री राहुल याने पीडितेच्या घरी जाऊन तिला फोनवरील संभाषणा कुणालाही सांगू नकोस अन्यथा तुझ्या मुलाला मारून टाकू, अशी धमकी दिली होती. मंगळवारी दुपारी पीडिता दुपारी साडे तीनच्या दरम्यान शेतात गेली असताना विशाल आणि राहुल यांच्यासह सोमनाथ गायकवाड या तिघांनी तिचं अपहरण केलं आणि तिला दुसऱ्या शेतात नेलं. तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला.
या प्रकरणी पीडितेने कोपरगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार या तिघांना विविध कलमांखाली अटक करण्यात आली. न्यायालयाने या तिघांची तीन दिवसासाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज