प्रेमविवाहाच्या वेलीवरिल कळ्या खुलन्या आदीच विस्कटल्या गेल्या.
समाधान फुगारे/मंगळवेढा
अनुराधा बिराजदार खून प्रकरणात आत्ता मयत अनुराधाचे लग्न कर्नाटक येथील श्रीशैल्य बिराजदार याच्याशी झाले असल्याचे पुरावे मंगळवेढा टाईम्सच्या हाती लागले आहेत.
१ ऑक्टोबर रोजी मयत अनुराधा व श्रीशैल्य बिराजदार यांनी विजापूर येथील कोर्टात कायदेशीर पणे विवाह केला होता. ही बातमी अनुराधाचे वडील विठ्ठल बिराजदार याना समजताच त्यांनी अनुराधा हिला ती शिक्षण घेत असलेल्या सिंदगी या गावी जाऊन तिला सलगर येथे घेऊन आले होते.
आपल्या मुलीने सालगड्याच्या मुलाबरोबर लग्न केले असल्याने या रागाच्या भरात बापानेच मुलीची हत्या केली होती. मात्र तिच्या लग्नाचे पुरावे मिळाले असल्याने तिचे लग्न झाले होते.
जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
अनुराधाचा जन्म सलगर बुद्रुक मधील बिराजदार या प्रतिष्टित घराणेशाही असलेल्या घरात झाला होता. तिचे वडील विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष होते. शिवाय शिक्षण प्रसारक मंडळ सलगर बुद्रुकचे सचिव होते. सलगर मधील विद्या मंदिर हायस्कूल व ज्यूनियर कॉलेज मध्ये ते जूनियर क्लार्क होते. व सर्व संस्था त्यांच्या ताब्यात आहे. आई माजी ग्रामपंचायत सदस्य, एवढा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक दरारा असणाऱ्या वडिलांना अनुराधाचा हा प्रेमविवाह मनाला धड़की भरवनारा होता.
साप्ताहिक मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा
अनुराधा अवघ्या तीन वर्षाची असताना अनुराधाची आई देवाघरी गेली. त्यांनंतर अनुराधाचे दहावी पर्यंतचे शिक्षण मामाच्या गावी झाले. त्यांनंतर बारावीला सलगरच्या विद्या मंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजात शिकत असताना तिचे श्रीक्षेल बिरादर या मुलाशी प्रेम संबंध जुळले. याची माहिती वडिलांना समजताच श्रीशैलच्या कुटुंबाला सलगर मधून जाण्यास भाग पाडले. पुढे कर्नाटकातील सिंदगी येथे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी अनुराधा गेली असता श्रीशैल अनुराधाची पुन्हा भेट झाली. त्यातच त्यांनी 1 ऑक्टोबरला विजापुर येथील कोर्टात जावून प्रेमविवाह केला. वडिलांना ही बातमी समजताच समाज्याच्या व खोट्या प्रतिष्टेच्या भिंती यांच्या सुखी वाटचालीस आडव्या आल्या.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज