मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली वारीवरून बरीच चर्चा रंगली आहे. फडणवीस यांनी दिल्ली वारीवरून सर्व शक्यता फेटाळून लावल्या असल्या, तरी संघातून आलेल्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा भूवया उंचावल्या आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनात विरोधीपक्ष नेतेपद फार काळ राहणार नाही. तसेच त्यांना माजी मुख्यमंत्री हे पण त्यांना जास्त काळ बोलावं लागणार नाही असा दावा केला आहे. नागपुरात बोलताना त्यांनी दावा केल्याने पुन्हा एकदा फडणवीसांच्या दिल्ली वारीवरून चर्चा रंगल्या आहेत.
भय्याजी जोशी पुढे म्हणाले की, या ठिकाणी कोणीच आजन्म मुख्यमंत्री राहत नाही. फडणवीस यांच्या जीवनातही विरोधीपक्ष नेतेपद हे फार काळ नाही आणि माजी मुख्यमंत्री हे पण फार काळ नाही. भाजपकडून सातत्याने हे सरकार कोसळणार याचा दावा केला जात आहे. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून सातत्याने शिवसेनेला साद घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज