mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी वंचित समुदायाने सतत चळवळीच्या माध्यमातून संघर्ष करावा-आ.प्रणिती शिंदे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

भारतीय लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी वंचित समुदायाने सतत चळवळीच्या माध्यमातून संघर्ष करण्याची गरज आहे. सत्ताधारी कोणत्याही पक्षाचा असो, पण ज्या वंचित समाज घटकासाठी वेगवेगळया सुधार योजना सरकार राबविते आहे, त्यांच्या आंमलबजावणीसाठी त्या त्या समाज घटकांनी शासनस्तरावर दबाव आणण्यासाठी सतत संघर्ष केला पाहिजे, तरच आपला देश आणि आपली लोकशाही वाचेल असे रोखठोक प्रतिपादन सोलापूर मध्यच्या आ.प्रणिती शिंदे यांनी केले.

ते सा.मंगळवेढा वेधच्या 6 व्या वर्धापन दिन, होलार समाज संघटना व भटक्या विमुक्त जाती संघ यांच्या वितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अखिल भारतीय होलार समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानदेव जावीर होते. व्यासपिठावर आ.रामहरी रूपनर, विठ्ठलचे संचालक भगीरथ भालके, उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील, तहसिलदार स्वप्निल रावडे, दामाजीचे माजी चेअरमन नंदकुमार पवार,ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष लतिफभाई तांबोळी,नगरसेविका सौ.टाकणे, दै.दामाजी एक्सप्रेसचे संपादक दिंगबर भगरे, जेष्ठ पत्रकार शिवाजी पुजारी, माजी उपसभापती रमेश भांजे, युवा नेते सचिन नकाते, शिक्षक नेते शामराव सरगर, संपादक शिवाजी केंगार,महादेव इंगोले, काँग्रेसचे नेते दिलीप जाधव,काँग्रेसच्या नेत्या सुवर्णा अशोक चेळेकर, मरवडे गावच्या माजी तंटामुक्त अध्यक्षा जाधव मॅडम, होलार समाजाचे नेते मधूकर भंडगे,खुपसंगीचे सरपंच संभाजी हेगडे, नानासो हेगडे यांच्यासह आदीजण उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे व पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी श्री दत्तात्रय पाटील यांनी सा.मंगळवेढा वेध पुरस्कार 2020 च्या सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करून आपल्या मनोगतात त्यांनी राज्यस्तरीय,राट्रीय,अंतरराष्ट्रीय पत्रकारदिनाचे महत्व सांगितले, आजची पत्रकारीता व भविष्यातील पत्रकारीतेवर आपले मत व्यक्त करून प्रसार माध्यमात प्रिंटमिडीया सर्वश्रेष्ठ असल्याचे  सांगितले.

यावेळी आ.रामहरी रूपनर यांनी सामाजिक,शैक्षणिक,राजकीय,क्रिडा,प्रसार माध्यम,शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अनमोल मार्गदर्शन करून शासकीय योजनांचा लाभ आपणास मिळविण्यासाठी एकजुटीची शक्ती पणाला लावण्याचा सल्ला दिला. आहे रे आणि नाही रे वर्गाच्या संघर्षावर उहापोह व्यक्त करताना मार्मिक भाष्य केले की, आपण किती वर्षे स्वतःला वंचित,दुर्बल म्हणवून घेणार, आपली मानसिकता यापुढे आपण आहे रे वर्गाला लाजविणारी अशी आणखी कणखर केली पाहिजे, विविध योजनांचा लाभ घेवून आपण स्वतःला समृध्द केले पाहिजे, आता चळवळीला लढावू माणसांची आणि संघर्षकरणार्‍या मानसिकतेची गरज आहे. आता आपली संषर्घ साधन मिळविण्यासाठी आणि आर्थिक समृध्दीसाठी स्वतः सक्षम होणे आवश्यक आहे. आपण मजबूत तर सर्व लाभाचे हक्कदार असल्याचे सांगून वर्धापन दिन सोहळयानिमित्त आयोजित गुणवंताच्या पुरस्कार सोहळयास त्यांनी शुभेच्छा दिल्या.

आ.प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या, धुळे जिल्हयातील राईनपाडा हत्या प्रकरणातील पाच विधवा महिलांची उपस्थिती या कार्यक्रमास असल्याने त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची त्यांनी आपल्या भाषणात शासनदरबारी केलेला प्रयत्न सांगून त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या समाजाचे नेते श्री मच्छिंद्र भोसले यांनी याप्रकरणात नेतृत्व करून शासनाचे लक्षकेंद्रीत केले होते. या कुटूंबाला शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा यासाठी आपण पाठपुरावा करावा मी त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे आ.प्रणिती शिंदे यांनी सांगितले,

होलार समाजाला आ.भालके यांनी मंगळवेढा शहरात जागा दिली , त्यांना मागासवर्गीय वस्तीगृहासाठी निधी उपलब्ध करून देवू, होलार समाजाची गेल्या अनेक वर्षापासून असलेले आभ्यास आयोगाची मागणी आता मार्गी लागेल, आता आपले सरकार आहे,यावेळी नक्कीच पूर्ण होईल त्यासाठी समाज संघटनेच्या नेत्यांनी सततचा पाठपुरावा करावा, समाजाचे सर्वांगीण विकासासाठी संघर्ष सुरू ठेवल्याने हा समाज सर्व बाजूने विकसीत होणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.

यावेळी विठ्ठलचे संचालक भगीरथ भालके, कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानदेव जावीर, लतिफभाई तांबोळी, पुरस्कार विजेते व भटक्या विमुक्त जाती संघाचे प्रदेश अध्यक्ष मच्छिंद्र भोसले, गडहिरे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

आ.प्रणिती शिंदे व आ.रामहरी रूपनगर यांच्या हस्ते वेध पुरस्कारचे वितरण करण्यात आले, जीवनगौरव पुरस्कार-मच्छिंद्र भोसले, सहकार रत्न महादेव बिराजदार, आदर्श सरपंच रामचंद्र मळगे, समाजभुषण हैदर केंगार, आदर्श पत्रकार ज्ञानेश्वर भगरे, आरोग्य मित्र चंद्रकांत पवार, आदर्श पशुमित्र ब्रम्हानंद कदम, आदर्श प्रशिक्षणार्थी संस्था चालक श्रीकांत पवार, आदर्श पोलिस अधिकारी दत्तात्रय पुजारी, आदर्श महिला बचत गट म्हणून ग्रामसंघ मरवडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमास पक्ष नेतेे अजित जगताप, नगरसेवक प्रविण खवतोडे, जि.प.चे माजी सदस्य बाबासाहेब पाटील, माजी सभापती संभाजी गावकरे, पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार, माजी उपसभापती इराप्पा पुजारी,तालुका आरोग्य अधिकारी नंदकुमार शिंदे, शिक्षक नेते सुरेश पवार, उपसरपंच विजय पवार तांडोरचे तंटामुक्ती अध्यक्ष सोमलिंग मळगे, नानासो मलगोंडे, आप्पासाहेब सांगोलकर,होलार समाजाचे नेते नाथा ऐवळे, किसन भजनावळे,मुढवीचे सरपंच तानाजी रोकडे,मारूती बाबर, दौलतराव माने, संजय कोळी, आप्पासाहेब न्यामगोंडे, येड्राव गावचे युवा नेते अमोल माने, गजेंद्र भोसले, युवा नेते सचिन चौगुले, गजानन पाटील सर, संंतोष मनगोंंड, धनाजी गावकरे, आण्णासो नांगरे-पाटील, संजय चौगुले,मिलिंद ढावरे, संपादक श्री समाधान फुगारे, प्रमोद बिनवडे, बाबासाहेब सासणे, तानाजी चौगुले, दादासाहेब लवटे, रामा सपताळे,विलास काळे, प्रशांत केंगार, वसंत केंगार, विशाल गेजगे, राहूल जावीर, राजू भंडगे, समाधान भंडगे, अक्षय टोमके, सागर खबाले, आप्पासाहेब बिराजदार यांच्यासह आदीजण मोठया संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमास कैकाडी,वडार,गोंधळी,लमाण,नाथपंथी डवरी-गोसावी, रामोशी,धनगर,मरिआईवाले,कोळी यांच्यासह होलार समाज मोठया संख्येने उपस्थित होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुकर भंडगे यांनी तर सुत्रसंचालन अक्षय टोमके, सौ.कोंडूभैरी,हैदर केंगार यांनी केले तर आभार संपादक शिवाजी केंगार यांनी मानले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: MangalWedhaSamajikSanskrutik

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
सांगोल्यातील चौघेजण १५ महिन्यांसाठी हद्दपार

सांगोल्यातील चौघेजण १५ महिन्यांसाठी हद्दपार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

पत्नी मेंबर, पतीचा हस्तक्षेप चालणार नाही; पद गमावणार, गुन्हाही दाखल होणार; शासन आदेशाचे पालन आवश्यक; अधिकारीही सतर्क

January 30, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मोठी बातमी! मंगळवेढा नगरपालिकेच्या विषय समित्यांवर ‘या’ पक्षाचे वर्चस्व; सभापतीपदी सुनंदा आवताडेसह यांच्या झाल्या निवडी

January 30, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे मतदान आणि निकाल पुढे ढकलला, तारखेत मोठा बदल; 5 ऐवजी ‘या’ तारखेला मतदान

January 29, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! नुकतेच संसार थाटलेल्या एका तरुण मजुराचा विमानतळावर डोक्यात दगड पडल्याने मृत्यू; सोलापूर विमानतळावर दुर्दैवी मृत्यू हृदय पिळवटून टाकणारा ठरला

January 29, 2026
अश्रूंच्या धारांनी बारामती चिंब! जिथून सुरूवात, तिथेच निरोप; उपमुख्यमंत्री अजितदादांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; महाराष्ट्रावर शोककळा

अश्रूंच्या धारांनी बारामती चिंब! जिथून सुरूवात, तिथेच निरोप; उपमुख्यमंत्री अजितदादांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; महाराष्ट्रावर शोककळा

January 29, 2026
मंगळवेढा बाजार समिती निवडणुकीत पहिल्या दिवशी ‘इतके’ अर्ज दाखल, बैठकांचे सत्र सुरू; निवडणूक रंगतदार होणार

शेतकऱ्यांनो! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे मंगळवेढा बाजार समितीतील लिलाव उद्या राहणार बंद; शेतमाल विक्रीस आणू नये

January 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा