मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा
मंगळवेढा तालुक्यातील सलगर खुर्द गावाजवळील पुलावर झालेल्या अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेच्या अपघातात बावची येथील प्रकाश यशवंत मासाळ (वय ४२) या इसमाचा जागीच मृत्यू झाला तर नाना सिधु भुसनूर (वय३८)रा.सलगर खुर्द हे गंभीर जखमी आहेत.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814
याबाबत सविस्तर माहिती अशी बुधवारी दुपारी चारच्या सुमारास प्रकाश मासाळ हे आपल्या सोबत नाना भुसनुर यांना घेऊन सलगर बुद्रुक येथून साखर कारखान्याने वाटप केलेली दिवाळीची साखर घेऊन घराकडे जाताना सलगर खुर्द गावाच्या पुलाजवळ समोरून येणाऱ्याा अज्ञात वाहनाने या दुचाकीस्वारास धडक दिली ही घटना ज्या ठिकाणी झाली त्या ठिकाणापासून आसपास दोन ते तीन किलोमीटरपर्यंत मनुष्य वस्ती नसल्याने ताबडतोब मदत होऊ शकली नाही मासाळ यांच्या डोक्याला जबर मार लागला रक्तस्त्राव झाल्याने तेेे जागीच मयत झाले तर त्यांच्यासोोबत असलेले नाना भुस्नुर हे गंभीर जखमी झाले यावेळी तिथून जाणाऱ्या लोकांनी शासकीय रुग्णवाहिकेत जखमी भुसनर यांना पुढीील उपचारासाठी सोलापूर येथे पाठवले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज