मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
लग्न झाल्याचे लपवून त्याने विधवा महिलेबरोबर दुसरा संसार थाटला. तिच्याकडे असलेले १५ लाख रुपये उकळले. त्यामुळे तिने पोटगीसाठी न्यायालयात धाव घेतली. पोटगी मंजूर झाल्याच्या आदेशाविरोधात तो सत्र न्यायालयात गेला. मात्र, न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळत पतीला दुसऱ्या पत्नीस पोटगी देण्याचा निर्णय कायम ठेवला.
हिंदू विवाह कायद्यात दुसऱ्या पत्नीस पोटगी देण्याची तरतूद नाही.
मात्र, महिलेची फसवणूक करून तिच्याशी लग्न केल्याचे निदर्शनात आल्यानंतर तिला दरमहा पाच हजार रुपये पोटगी देण्याचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाचे आदेश सत्र न्यायालयाने कायम ठेवले आहेत. उषा यांच्या पहिल्या पतीचे निधन झाल्याने त्या तीन मुलांसह माहेरी पुण्यात राहत होत्या.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर उषा वेगळ्या राहू लागल्या. मात्र, तो त्यांना घरी जाऊन त्रास देऊ लागला. सुरेशच्या पहिल्या पत्नीने व भावांनी त्यांना मारहाण केली. त्यामुळे उषा यांनी कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यानुसार पोटगी आणि प्रतिबंधात्मक आदेशासाठी न्यायालयात धाव घेतली. त्यावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी उषा यांना दरमहा पाच हजार रुपये पोटगी व त्यांच्या घरात न जाण्याचे आदेश सुरेशला दिले
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज