मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातील थकित १३ महिन्यांच्या वेतनाचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला आहे . शहर मध्य विधानसभा मतदार संघाच्या आ . प्रणिती शिंदे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे.
३ मार्च रोजी विधिमंडळाच्या पटलावर हा विषय चर्चेला येणार आहे . त्यामुळे विधिमंडळ कक्षा अधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनाला पत्र पाठवून या प्रकरणाची माहिती दोन दिवसात शासनाकडे पाठवण्याचे आदेश दिले आहे . याबाबतचे पत्र महापालिका प्रशासनास प्राप्त झाले आहे . सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे .
तब्बल १३ महिन्याच्या 4 वेतनाचा प्रश्न प्रलंबित आहे . या वकित वेतनासाठी परिवहन कर्मचाऱ्यांनी यापूर्वी बेमुदत संप देखील केला होता . मात्र या पजाराचा प्रश्न कामगार न्यायालयात प्रलंबित असल्याने हा पगार दिला जात नाही . आता या पगारीसाठी कामगार आक्रमक झाले आहेत . कामगारांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आ . प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून शासनाला जाब विचारला आहे . आ . प्रणिती शिंदे यांनी परिवहनचा प्रश्न तारांकित प्रश्नाच्या माध्यमातूज विधानसभेत उपस्थित केला आहे .
सोलापूर महापालिकेच्या परिवहन उपक्रमातील ३६७ कायम सेवकांचे ऑक्टोबर २०१७ पासून जून २०१८ तसेच प्रॉनास्ट २०१९ ते नोव्हेंबर २०१५ या महिन्याचे वेतन यकीत आहे . हे खरे आहे काय ? अमाल्यास या कायम सेवकांना व इतर कर्मचान्यांच्या तुलनेत महागाई भत्ता वोग्य प्रमाणात का दिला जात नाही ? या संदर्भात शासनाने माहिती घेऊन वा कर्मचाऱ्याना थकीत वेतन देण्याचा , तसंच महागाई भत्ता देण्यासंदर्भात चोग्य ती कारवाई करावी . या कर्मचाऱ्याना यकीत वेतन आणि महागाई भत्ता देण्यास विलंब झाल्याची कारणे काय आहेत असे तीन प्रश्न शिंदे वांनी विधिमंडळात उपस्थित केले आहेत . उपस्थित केलेल्या प्रश्नाला जवारविकास मंत्री अमित पटेल आणि सुरेश वरपूडकर खुलासा करणार आहेत . याबाबतची माहिती दोन दिवसात शासनाकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज