मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-तुम्ही येथे राहू नका.. तुम्ही लवकर रूम खाली करा.. असे म्हणून मारहाण केल्याप्रकरणी रोहित पंडित हत्तुरे (रा. सेटलमेंट फ्री कॉलनी, सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहिणी सोमनाथ गायकवाड (वय 22, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी, सोलापूर) यांनी सलगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 14 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास सेटलमेंट फ्री कॉलनी परिसरात घडली. रोहिणी गायकवाड आणि त्यांचे पती घरासमोरील कट्ट्यावर बसले होते.
त्यावेळी तडीपार आरोपी रोहित हत्तुरे याने रोहिणी गायकवाड यांच्या पतीसोबत वाद घातला. तुम्ही येथे राहू नका.. तुम्ही लवकर रूम खाली करा असे म्हणून शिवीगाळ केली. त्यावेळी गल्लीत राहणाऱ्या अमोल चंद्रकांत गायकवाड यांनी आरोपी हत्तुरे यास तू असे का करतो.. असे म्हणून थांबवण्याचा प्रयत्न केला.
त्यावर रोहित हत्तुरे याने थांब तुला बघतो.. असे म्हणून घरात जाऊन कोयता आणला. गायकवाड यास उलटा कोयता करून खांद्यावर मारहाण केली. फिर्यादीच्या पतीलाही रोहित हत्तुरे याने मारहाण केली. अमोल गायकवाड यांच्या आईलाही शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज