मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुका पत्रकार संघ व रेड अलर्टफायर सिस्टिमचा उपक्रम
मंगळवेढा तालुका पत्रकार संघ व रेड अलर्ट फार सिस्टिम यांचे संयुक्त विदयमाने रविवार दि.१६ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वा .पोलिस स्टेशन पाठीमागे असणाऱ्या पत्रकार भवन येथे मंगळवेढा शहर व तालुक्यातील नागरिक व महिलांसाठी अग्निशमन मार्गदर्शन व आपत्तकालीन व्यवस्थापनाची सुरक्षा कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याची माहिती रेड अलर्ट फायर सिस्टिमचे प्रमुख जी . एम . दिवटे यांनी दिली.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मंगळवेढयाचे उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थान पत्रकार संघाचे संस्थापक दिगंबर भगरे भूषविणार आहेत.
तर विशेष अतिथी म्हणून डॉ. शरद शिर्के उपस्थित राहणार असून सर्व पत्रकार व नागरिक बंधू भगिनींनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मोहन माळी यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज