मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा – रत्नागिरी – नागपूर महामार्गाच्या सुरू असलेल्या कामावरील ठेकेदाराच्या वाहनाने मंगळवेढा ते खोमनाळ रस्त्याची दाणादाण उडवली असून त्यामुळे दुचाकी वाहन धारकांना जीव मुठीत धरून वाहन चालवण्याची वेळ आली याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले.
नागपूर ते रत्नागिरी या महामार्गाच्या कामासाठी या ठेकेदाराने आपला वाहनतळ मंगळवेढ्यापासून तीन किलोमीटर अंतरावर केला असून , तिथून हिवरगाव येथून कच्चामाल दगड आणताना या अवजड वाहनांमुळे कमी रुंदीच्या रस्त्याची पाक दाणादाण उडवली आहे . परंतु यासाठी ठेकेदाराने आपली अवजड वाहने व्यवस्थित जाता यावीत म्हणून रस्त्याच्या कडेला मुरूम टाकून साईड पट्टी भरून दररोज पाणी मारले जाते , परंतु पावसामुळे झाडीपट्टीवरील मुरूम रस्त्याच्या मध्यभागी आल्यामुळे रस्ता सध्या निसरडा झाला . त्यामुळे दचाकी चालणाऱ्याचे दचाकी घसरून पडण्याची भीती निर्माण झाली आहे .
याशिवाय रस्त्यावर आणि ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत , ते खड्डे बुजवण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम खात्याने कसल्याही प्रकारचे प्रयत्न केले नाहीत . याबाबत त्यांना अनेक वेळा विचारणा केली असता या रस्त्याची दुरुस्ती या महामार्गाचा ठेकेदार करून देणार असल्याचे सांगून वेळ मारून नेली जात आहे , पण प्रत्यक्षात हा ठेकेदार कधी करणार हा प्रश्न मात्र अजून अनुत्तरित राहिला आहे . कामासाठी लोकप्रतिनिधीने निधी मंजूर केला होता परंतु हा निधी या खात्याने इतर ठिकाणी वापरल्यामुळे याचा मोठा फटका या भागातील वाहनचालकाला बसला .
सध्या खड्यामुळे वाहनधारकांना अपघाताचे निमंत्रण मिळत आहे . त्यामुळे एखाद्याचा जीव गेल्यावर संबंधित खाते जागे होणार का ? असा देखील प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे . या मार्गावरून पुढे विजापूर व जत कडे जाणारे वाहणे खुश्कीचा मार्ग म्हणून याच मार्गावरून जात असतात , परंतु या रस्त्याची दयनीय अवस्था पाहता या मार्गावर वाहनाची संख्या कमी झाली . त्यामुळे याचा परिणाम या मार्गावरील अनेक छोट्या मोठ्या व्यवसायावर झाला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज