मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
सोलापूर पुणेसह विविध ठिकाणी 30 ते 35 गुन्हे दाखल असलेली अट्टल चोरट्यांची टोळी पकडण्यात माळशिरस पोलिसांना यश आले असून त्यांच्याकडून दोन एलसीडी टीव्ही वेगवेगळ्या कंपन्यांचे 14 मोबाईल, सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा 10 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
माळशिरस शहर व परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून घरफोडी व चोरीचे अनेक प्रकार घडत होते. याकडे माळशिरसचे पोलिस निरीक्षक विश्वंभर गोल्डे यांनी पथक तयार करून तपासाला गती दिली आणि शिताफीने आरोपींना गजाआड केले. पोलिस सूत्रांकडून मिळलेली माहिती अशी की, 16 जानेवारी रोजी पोलिस कर्मचारी रात्रीची गस्त घालत असताना त्यांना माळशिरस-पिलीव रोडवर मोटेवाडी गावाजवळ आरटीओ प्रशिक्षण केंद्राजवळ काही व्यक्ती झुडपामध्ये हत्यारासह दबा धरून बसल्याची माहिती मिळाली.
ही कामगिरी पोलिस निरीक्षक विश्वंभर गोल्डे, सपोनि शशिकांत शेळके, आदिनाथ महानवर, पोहेकॉ विक्रम घाटगे, समीर पठाण, अभिजीत कुंभार, अमोल बकाल, सचिन हेंबाडे, सुभाष पवार, राहुर रुपनवर, सुशिल साळुंखे, प्रणय शिंदे, राहूल झुंझुंर्डे, समाधान शेंडगे, सोमनाथ माने, तुळशिराम गायकवाड, महिला पोकॉ सुनीता केंगले यांनी केली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज