मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांनतर त्यांनी पत्रकार परिषद घेत नागरिकत्व सुधारणा कायद्याला समर्थन जाहीर केले. यावरुन रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आंनदराज आंबेडकर यांनी निशाणा साधला आहे.
सीएएच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे एकाचवेळी दोन दगडांवर पाय ठेवत आहेत. शिवसेनेनं भाजपसोबत काडीमोड घेतला असला तरी त्यांना संपूर्णपणे संबंध तोडायचे नाहीत. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत नव्याने बनलेली मैत्री कायम ठेवायची आहे, असं आंबेडकर म्हणाले आहेत.
नागरिकत्व सुधारणा कायद्यावर उद्धव ठाकरे दोन्ही बाजूंनी बोलत आहेत.मात्र, त्यांनी एकाचवेळी दोन दगडांवर पाय ठेवू नये, असा सल्ला आंबेडकरांनी दिला आहे.
दरम्यान, 1 एप्रिलला संपूर्ण देशात सीएए लागू होणार आहे. त्यावेळी राज्यात सीएए लागू होईल का नाही हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे. तसेच त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज