मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
शिक्षिकेशी प्रेमसंबंध जोडून आणि तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या संभाजी अर्जुन कोकरे (वय 26, रा. अंकलखोप, ता. पलूस) याला न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. शिक्षिकेच्या फिर्यादीनुसार कोकरे याच्याविरुद्ध 18 लाख रुपये उकळणे तसेच बलात्कार आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील आष्टा परिसरातील एका माध्यमिक शाळेत ही शिक्षिका काम करते. सहा वर्षांपूर्वी संशयित संभाजी कोकरे व तिचे प्रेमसंबंध जुळले. संभाजी याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला, अशी तिची फिर्याद आहे.
लग्नाचे आमिष दाखवून वरचेवर तिच्याकडून 3 लाख 90 हजार रुपये उकळले. तसेच गाडी घेण्यासाठी दीड लाख रुपये तिच्याकडून घेतले. शिक्षिकेच्या नावावरचा 12 लाख रुपयांचा फ्लॅट विकून ते पैसेही त्याने हडप केले. शिक्षिकेने संभाजी याच्याकडे लग्नासाठी तगादा लावला होता.
त्यामुळे संभाजी याने तिला मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याने शिक्षिकेने मंगळवारी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी संशयित कोकरे याला अटक करून बुधवारी न्यायालयात हजर केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज