मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
हभप इंदुरीकर महाराज देशमुख वादाच्या भोवर्यात सापडलेल्या असताना आज नगर येथे खासगी बंदोबस्तात त्यांना कार्यक्रमाच्या स्थळी आणण्यात आले. खासगी सुरक्षारक्षकांच्या मदतीने महाराजांचे कीर्तन पार पाडले. यावेळी मोठी गर्दी या ठिकाणी जमली होती.
गेल्या आठवड्यामध्ये मुलगा- मुलगी या वक्तव्यावरून महाराज वादात सापडले होते. इंदुरीकर महाराज यांनी एका कार्यक्रमात केले होते.
त्यांचे कीर्तन होणार की नाही, अशी त्यांच्या भक्तांमध्ये कुजबुज सुरू झालेली होती. आज नगर येथील भिंगार या गावातील श्री शुक्लेश्वर मंदिरामध्ये त्यांचे कीर्तन ठेवण्यात आले होते. त्यांच्या बंदोबस्तासाठी खासगी बॉक्सर नियुक्त करण्यात आले होते. व बंदोबस्तात त्यांना कीर्तनाच्या स्थळी आणण्यात आले. बघ्यांची गर्दी सुद्धा मोठ्या प्रमाणावर झालेली होती. दरम्यान यावेळी कीर्तन सुरू असताना कोणती शूटिंग करू नये अशा सूचना देण्यात आल्या होत्या.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज