मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा शहरातील शिवप्रेमी चौकातील पान शॉपच्या जवळ दामाजी किसन जगदाळे (वय.३२,नागणे गल्ली,मंगळवेढा) व राजू गुलाब इनामदार (वय.५०,हजारे गल्ली,मंगळवेढा) मटका घेणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पोलिसांनी १० हजार रुपयांचे मटका साहित्य मुद्देमाल जप्त केला आहे. बुकीमालक बापू कलूबर्मे व चाँद चन्ने यांच्याविरुद्ध ही गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की , शिवप्रेमी पान शॉप जवळ दामाजी जगदाळे व चोखामेळा चौकात राजू इनामदार हे मटका घेत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून मटका साहित्य रोख १० हजार ८४ रु. मुद्देमाल जप्त केले.
काल सोमवारी रात्री ७.१५ च्या सुमारास मटका घेणारे दामाजी जगदाळे व राजू इनामदार यांना ताब्यात घेतले असता बुकी मालक बापू कलूबर्मे यांच्याकडे मटका देत असल्याचे सांगितले. मात्र बापू कलूबर्मे हा फरार झाला आहे.त्यांच्याकडील १० हजार रुपयांचे साहीत्य जप्त केले असून.या दोघांनी मंगळवेढ्याचे बापू कलूबर्मे व चाँद चन्ने याचे नावे सांगितले.
पोलिसांनी दामाजी जगदाळे व राजू इनामदार यांना ताब्यात घेतले.तर बापू कलुबर्मे व चांद चन्ने हे पसार झाला आहे.
पोलिस कॉन्स्टेबल नागनाथ डबरे यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज