मंगळवेढा टाइम्स वृत्तसेवा:-
विनापरवाना परप्रांतीयांना घर भाड्याने दिल्याप्रकरणी शहरातील घरमालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस हवालदार परशुराम शिंदे यांनी शहर पोलिस ठाण्यात सोमनाथ अधटराव याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
परप्रांतीयांना भाडेकरू म्हणून जागा दिली त्याप्रसंगी घरमालकाने त्याची माहिती पोलिस ठाण्यात द्यावी, असे अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. त्यांच्या आदेशाचे पालन न करता येथील सोमनाथ शरद अधटराव (वय 38, रा. व्यासनारायण झोपडपट्टी, पंढरपूर) यांनी त्यांच्या जागेत परराज्यातील नागरिकांना भाडेकरू म्हणून घेऊन ठेवले आहे. त्यासंबंधीची त्यांनी कोणतीही माहिती पोलिस ठाण्यात दिली नाही.
त्यांनी अपर जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून आदेशाचा अवमान केला म्हणून त्यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज