मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढवित असलेले दामाजी कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांच्या विजयासाठी त्यांची पत्नी अंजलीताई आवताडे या ‘होम टू होम’ जाऊन मतदारांशी संवाद साधत आहेत. त्यांनी मारापूर,लेंडवेचिंचाळे,लक्ष्मी दहिवडी,आंधळगाव,गणेशवाडी,मानेवाडी, हुन्नूर, रेवेवाडी,पडोळकरवाडी आदी भागात दौरा केला असून त्यांच्या या नवीन कल्पनेचे मतदारसंघात कौतुक होत आहे.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे सुधाकर परिचारक,काँग्रेस कडून प्रा.शिवाजीराव काळुंगे तर राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार भारत भालके यांच्यात चौरंगी सामना होत असला तरी सध्याच्या घडीला दोन साखर कारखाने, एक सूतगिरणी, कृषी उद्योग संघ, खरेदी विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती, निम्म्याहून अधिक ग्रामपंचायती, जिल्हा परिषद व पंचायत समितीवर सत्ता आवताडे यांच्याकडे आहे.
या मतदारसंघात समाधान आवताडे यांच्या पत्नी अंजलीताई आवताडे, त्यांचे बंधू संजय आवताडे यांच्या पत्नी सुकेशनी आवताडे त्यांच्याबरोबर समाजकल्याण सभापती शीला शिवशरण, जि.प. सदस्या मंजुळा कोळेकर, रतन पडवळे, अंजली शिंदे, प्रियांका आवताडे, सुनीता पवार, लक्ष्मी दहिवडीच्या सरपंच मनीषा आवताडे, महादेवी मेतकुटे, सारिका पाटील या महिला घरोघरी जाऊन महिला मतदारांशी संवाद साधत समाधान आवताडे यांना साथ द्या, आम्ही मतदार संघाचा विकास करून दाखवू, असे आवाहन करत गावोगावी ‘होन टू होम’ प्रचार यंत्रणा राबवत आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज