

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील महमदाबाद येथे घरगुती कारणावरून लक्ष्मण घुंबरे याने भावाच्या कुटुंबास पेट्रोल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पुतण्या शरद घुमरे याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तसेच दहा-बारा दिवस रुग्णालयात उपचार सुरु असलेला भाऊ सोपान घुमरे यांचा उपचारा दरम्यान रात्री शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814

भाऊ लक्ष्मण घुमरे यांने केलेल्या या कृत्यातून सोपान घुमरे यांचा बी.एससी शिक्षणासाठी बाहेरगावी असलेला मुलगा संतोष व दहावीत शिकणारी मुलगी सुरेखा आई-वडिलांपासून लांब अंतरावर झोपल्याने सुदैवाने यातून बचावल्या होत्या. सदरची घटना 6 नोव्हेंबर रोजी पहाटे चारच्या सुमारास घडली होती. आरोपी लक्ष्मण घुमरे यास पोलीसांनी तात्काळ ताब्यात घेतले.
पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर शेजारी व नातेवाईक यांनी तातडीने जखमी सोपान, सोनाबाई व शरद या तिघांना खासगी वाहनाने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

उपचार सुरू असताना 50 टक्के पेक्षा जास्त भाजलेने शरदचा मृत्यू झाला. सोनाबाई व सोपान हे पती-पत्नी भाजले असून त्यांच्यावरही सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. घरात लक्ष्मण व त्याचे इतर तीन भाऊ गेल्या वर्षांपासून वेगळे राहत होते. आरोपी लक्ष्मण हा यापूर्वी एकत्र कुटूंबातील कारभारी होता. व ऊसतोड मूकादम म्हणून ऊस तोडणीसाठी टोळ्या भरत असे.
आपल्या सर्व भावांनाही आपल्याच टोळीत ऊसतोड करण्यास नेत होता. आरोपीस दारूचे व्यसन असलेने सोपान व इतर भाऊ गेल्या वर्षीपासून वेगळे राहिले होते. सख्खा भाऊच दुसऱ्या भावाच्या संपूर्ण कुटुंबांच्या जिवावर उठल्याने हा परिसर या घटनेने हादरून गेला.






बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













