मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथील महालिंगराया मंदिराशेजारी असलेल्या वन विभागाच्या पडीक जागेत बिहार राज्यातील शंभू शिव महतो (वय ५५) या इसमाचा मृतदेह सापडला असून मंगळवेढा पोलिसात अकस्मात मयत अशी नोंद करण्यात आली आहे .
यातील मयत शंभू शिव महतो हे दि . १२ रोजी सायंकाळी ६ . ०० च्या दरम्यान हुलजंती येथील महालिंगराया मंदिराशेजारी असलेल्या पडिक जागेत मृतावस्थेत मिळून आले .
या घटनेची खबर भोलाराया सिरकूसून राय ( मूळ बिहार सध्या हुलजंती ) याने पोलिसांत दिली आहे . मयताचे कारण स्पष्ट नसल्याने पोलिसांनी मयताचे प्रेत राखून ठेवले आहे . अधिक तपास ए . एस . आय . जमादार हे करीत आहेत.
——-
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज