मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मोहोळ तालुक्यातील युवतीच्या अपहरणप्रकरणी अटकेत असलेल्या नेताजी उर्फ बाळासाहेब सुरवसे याचा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी जामीन मंजूर केला . दि . २३ नोव्हेंबर २०१९ रोजी युवती ही घरात कोणालाही न सांगता निघून गेली होती .
नातेवाईक तसेच कुंटूबियांनी शोध घेत असताना युवती ही सुरवसे व इतर दोन युवक हे मोटारसायकलवर दिसून आले होते . याप्रकरणी युवतीच्या वडीलांनी मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला होता . पोलिसांनी सुरवसे याला या प्रकरणामध्ये अटक केली होती .
अटकेनंतर सुरवसे याने सोलापूर न्यायालयामध्ये केलेला जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता . या निर्णयाच्या विरोधामध्ये अॅड . जयदीप माने यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल केला होता . हा अर्ज न्यायालयाने मंजूर केला असून सुरवसे याला जामीन मंजूर केला . या गुन्ह्यामध्ये अॅड . जयदीप माने , ॲड . सत्यव्रत जोशी यांनी तर सरकारतर्फे अॅड . एस . एच . यादव यांनी काम पाहिले .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज