मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
खंडणी मागितलेल्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपींवर मोक्का अंर्तगत कारवाई करण्यात आली आहे . याबद्दल सविस्तर माहिती, काही दिवसांपूर्वी शहरातील तरुणाची मोटारसायकल घेवून त्यांचे अपहरण केले होते . तसेच त्याला खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला होता . यामध्ये शंकर सुरवसे , वैभव फसलकर , ज्ञानेश्वर कडलासकर , रोहित अभंगराव , सचिन आवताडे आणि इतर अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला होता.
या आरोपीपैकी शंकर सुरवसे हा जिल्हा युवक काँग्रेसचा माजी सरचिटणीस होता . पोलीस उपअधिक्षक डॉ . सागर कवडे यांच्या या धडक कारवाईने वेटींग लिस्टमध्ये असलेल्या अनेक गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत . गुन्ह्याच्या तपासात वरील आरोपी आपली टोळी बनवून संघटीत गुन्हेगारी करीत आर्थिक लाभ मिळवत असल्याचे निष्पन्न झाले . त्यांच्या गुन्हेगारी कारवायांना पायबंद घालण्यासाठी पंढरपूर पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम कारवाईचा प्रस्ताव पोलिस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता . सदरच्या मोक्का अंर्तगत कारवाईला पोलिस महानिरीक्षकांनी मंजुरी दिली असल्याची माहिती पोलिस उपाधिक्षक डॉ . सागर कवडे यांनी दिली . या गुन्हेगारांचा आता मोक्का कलमानुसार तपास होणार आहे.
सदरची कारवाई ही पंढरपूर विभागात पाचवी कारवाई आहे . पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात २ गुन्ह्यात ३२ आरोपींवर , तालुका पोलिस ठाण्यात एका गुन्ह्यात ६ आरोपींवर तर करकंब पोलिसांनी २ गुंह्यात १० आरोपींवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे . आतापर्यंत विभागात ४८ आरोपींवर मोक्का लावण्यात आल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत . पंढरपूरातील संघटीत गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस दल शर्थीचे प्रयत्न करीत आहे . अशा टोळ्यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे असे आवाहन पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ . सागर कवडे यांनी केले आहे.
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज