मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
iQOO 3 स्मार्टफोन भारतात लॉंच होता आहे. चिनी कंपनीनं iQOO हा नव्या ब्रँडचा फोन आणला आहे. नव्या दमासह नवी फिचर असलेला फोन भारतात लॉंच करण्यात आलाय. Vivo ब्रॉंडला भारतात ग्राहकांनी पसंती दिली. त्यामुळे आता या नव्या ब्रॅंडला पसंती मिळणार यात शंकाचं नाही. भारतातला हा दुसरा 5G फोन असणार आहे. Realme नं याआधी पहिला 5G फोन लॉंच केला आता त्या पाठोपाठ Vivo नं आपल्या सबब्रॅंडलाच नव्या ओळखीसह बाजारात आणल आहे.
अप्पो आणि विओ हे सुरूवातीपासूनचं बाजारपेठांमध्ये एकमेकांचे स्पर्धक राहिले आहेत. त्यामुळे अप्पो पाठोपाठ आता विवो ही या 5G च्या स्पर्धेत उतरल आहे.नव्या iQOO 3 मध्ये रिअर कॅमेरासह विविध वैशिष्टये देण्यात आलीय.6.44″ Super AMOLED Display असणार आहे. यामध्ये 12GB रॅम देण्यात आल आहे. तर फोन मेमरी 256GB आहे. विशेष म्हणजे यामध्ये 48MP Quad Camera असून 16MP चा फ्रंट देण्यात आलं आहे.
ग्राहकांसाठी एक दु;खाची बातमी आहे. ती म्हणजे हा फोनमध्ये जरी 5G हे नवं फिचर असलं तरी देखिल ते ग्राहकांना लगेच वापरात आणता येणार नाही आहे. ते 5G वापरासाठी वापरकर्त्यांना वाट पाहावी लागणार आहे.
iQOO 3 बॅंडचा 5G वाला फोन 45 हजारांपर्यंत उपलब्ध होणार आहे. Realme नं आणलेल्या नव्या फोनच्या तुलनेत हा फोन अधिक स्वस्त आहे. त्यामुळे आता ग्राहक कोणाला अधिक पसंती देतात हे पाहावं लागेल.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज