मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
जामिनावर सुटल्यानंतर तडीपार आणि एम.पी.डी.ए.ची प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी मुंबई पोलीस दलातील एका पोलीस निरीक्षकाने गुन्हेगाराकडेच 70 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या कारवाईतून समोर आला आहे.
चंद्रकांत जाधव (57) असे या लाचखोर पोलीस निरीक्षकाचे नाव असून लाचेच्या रकमेपैकी 10 हजार रुपये स्वीकारताना एसीबीने त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी हा वडाळा टी. टी. पोलीस ठाण्याच्या पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार आहे. 14 जानेवारीला त्याच्यावर गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्याला अटक केली.
फिर्यादी गुन्हेगाराने एसीबीचे मुख्यालय गाठून याची तक्रार दिली. या तक्रारीवरुन एसीबीच्या पथकाने केलेल्या पडताळणी जाधव पैसे मागत असल्याचे स्पष्ट झाले. एसीबीने सापळा रचून सांगितल्याप्रमाणे, फिर्यादी गुन्हेगाराने जाधव यांना कॉल करत 10 हजार रुपयांची व्यवस्था झाल्याचे सांगितले.
जाधव यांनी त्याला 10 हजार रुपये घेऊन बोलावले. फिर्यादी गुन्हेगाराकडून लाचेची ही रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने जाधव याना रंगेहाथ अटक केली. एसीबीच्या या कारवाईने मुंबई पोलीस दलात एकच खळबळ उडाली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज