मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सुचनेव्दारे आमदार प्रणिती शिंदे बोलताना सांगितले कि, महाराष्ट्र गेल्या काही वर्षापासून महिलांवर अत्याचारांचे प्रमाण वाढले आहेत. सोलापूरात देखील मागील काही दिवसात एका अल्पवयीन मुलीवर सुमारे दहा जणांनी दुष्कर्म केल्याची माहिती समोर आली.
हिंगणगण, आंध्रप्रदेश, सोलापूर तसेच इतर ठिकाणी महिलांवर अत्याचार झालेल्या प्रकणात 90 दिवसाच्या आत आरोपीविरुध्द फॉस्टस्ट्रक कोर्टात खटला दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे.
हिंगणगण ठिकाणी आरोपींना जागेवरच पकडण्यात आले त्यांना लवकरात लवकर कारवाई व शिक्षा झाली पाहिजे. ज्या ठिकाणी महिलांवर अत्याचार होतात अशा ठिकाणी पोलीसांनी त्या महिलाकडे जावे, तसेच जे पिढीत कुटुंब आहे त्यांना शासकीय नोकरीत सामावून घेतले पाहिजे. आमदार प्रणिती शिंदे यांनी मा.गृहमंत्री यांच्याकडे महिलांवर अत्याचार करणारया आरोपीविरुध्द 90 दिवसाच्या आत फॉस्टस्ट्रक कोर्टात खटला चालवून त्यांना तात्काळ कारवाई व शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी प्रश्नाव्दारे केली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज