मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याच्या चुलतभावाचा मुलगा अब्दुल्ला खान याचे नुकतेच वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी निधन झाले . त्याच्या या अकाली मृत्यूमुळे त्याचे कुटुंबीच आणि मित्र परिवारात हळहळ व्यक्त होत आहे.
गेले काही दिवस अब्दुल्ला सदयाशी संबंधित आजारावर लीलावती हॉस्पिटलामध्ये उपचार घेत होता . मात्र उपचारादरम्यान सोमवारी रात्री त्याने अखेरचा श्वास घेतला . अब्दुल्लाचे काका मतीन खान यांनी मंगळवारी ही माहिती दिली.
बॉडी बिल्डर असलेल्या अब्दुल्लाचे आई – वडील इंदोरला राहतात . त्यामुळे त्याचा मृतदेह रस्तामार्गे इंदोरला नेण्यात येईल. तिथे त्याच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत . असेही अकाली जाण्याबदल सलमानने ट्विटरवर हळहळ व्यक्त केली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज