मंगळवेढा टाइम्स वृत्तसेवा:-
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संकुलातील विद्यार्थ्यांसाठी अयोजित केलेल्या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी स्थळचित्रण, रांगोळी, वक्तृत्व स्पर्धा, लघुनाटिका स्पर्धा, पोस्टर मेकिंग स्पर्धेत मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत आपल्या दिमाखात कलाविष्काराचे दर्शन घडविले. महोत्सवात म “फॅशन शो”चा जलवा बघायला मिळाला.
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कॅम्पसमधील विद्यार्थ्यांसाठी गत वर्षापासून युवा स्पंदन या सांस्कृतिक सोहळ्याचे मेजवानी मिळत आहे. विद्यापीठ कॅम्पसमधील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, एक हक्काचे व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्यात एक नवी ऊर्जा प्राप्त व्हावी, या उद्देशाने कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या संकल्पनेतून युवा स्पंदन महोत्सव विद्यापीठात रंगला आहे.
सोमवारी या स्पर्धेला सुरुवात झाली असून विद्यापीठातील १० संकुलातील पाचशे विद्यार्थ्यांचा यात सहभाग नोंदवला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज