मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
वडिलांच्या खुनाची घटना मार्गी लावून संशयित आरोपी मुलाने आपल्या साथीदारांना घेऊन एका तीर्थक्षेत्राची वारी केल्याची माहिती अंगद घुगे खून प्रकरणात उजेडात आली आहे. या वारीतील एक साथीदार फरार असून इतरांचीही कसून चौकशी करण्यात येत आहे.
जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
लऊळचे कृषी सहायक अंगद घुगे खूनप्रकरणी मंगळवारी पोलिसांनी घुगे यांचा मुलगा विशाल याची दिवसभर कसून चौकशी केली. दोन दिवसांत खुनाच्या घटनेचा पूर्णतः उलगडा होण्याची शक्यता आहे.
विशालची वैद्यकीय तपासणी
मंगळवारी पोलिसांनी विशालला ग्रामीण रुग्णालयात नेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर त्याची कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीनंतर प्रमुख संशयित आरोपी घुगे परिवारातीलच आणखी एक सदस्य पोलिसांच्या हाती लागेल, अशी माहिती पुढे येत आहे. खुनाची घटना घडल्यानंतर काही संशयित आरोपी तीर्थक्षेत्राला गेल्याचा तपास पोलिस पथकाने काढला. त्यामधील एकजण फरार असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत. त्यामुळे दोन दिवसांत आरोपींची संख्या व खून प्रकरणातील कटकारस्थान उघड होणार आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज