मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
टोळीने एकत्र येऊन सांगोला शहर व तालुक्यात गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या प्रशांत उर्फ पप्पू बबन धनवजीर , रामा सुरेश बनसोडे , अमोल जालिंदर माने व लखन राजू चव्हाण या चौघांना सोलापूर शहर वगळता संपूर्ण सोलापूर जिल्हा तसेच सांगली जिल्ह्यातील जत ,आटपाडी व कवठेमहांकाळ या तालुक्यातून १५ महिन्याकरता हद्दपार करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी मंजूर केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी दिली .
प्रशांत उर्फ पप्पू धनवजीर , रामा बनसोडे , अमोल माने , लखन चव्हाण या चौघांविरोधात एकत्रितपणे किंवा टोळीने केलेले दोन गुन्हे | सांगोला पोलिसात नोंद आहेत .तर प्रशांत धनवजीर यांनी एकट्याने केलेला एक गन्हा | सांगोला पोलिसांच्या दप्तरी नोंद आहे .
याआधारे महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ कलम | ५५ प्रमाणे वरील चौघांना | सोलापूर , सांगली , सातारा व पुणे या जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात यावे असा प्रस्ताव पोलीस निरीक्षक सांगोला यांनी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या कार्यालयाकडे पाठविला होता . अखेर या प्रस्तावास पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण कार्यालयाने मंजुरी देऊन टोळीप्रमुखांसह इतर तीन साथीदारांना सोलापूर शहर वगळता संपूर्ण जिल्हा व सांगली जिल्ह्यातील शेजारील जत , आटपाडी व कवठेमहांकाळ या तालुक्यातून १५ महिन्यांकरिता हद्दपार करण्याचा आदेश दिला आहे .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज