मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
जिल्ह्यात २०१९-२० या आर्थिक वर्षात नावीन्यपूर्ण योजनेतून १४ कोटी ३९ लाख रुपयांची कामे झाली आहेत. यामध्ये सोलापूर शहरात २ कोटी ५० लाख रुपयांची कामे करण्यात आली आहेत तर नाला खोलीकरणावर २ कोटी ९९ लाख रुपये खर्च करण्यात आली आहेत.
मुद्रांक कार्यालय, उपनिबंधक कार्यालये व उपकोषागार कार्यालयात कॉम्पॅक्टर बसविण्यासाठी २ कोटी १४ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. २०२०-२१ साठी १४ कोटी ८४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून संबंधित विभागांकडून प्रस्ताव मागविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे यांनी दिली.
मंगळवेढा ते पंढरपूर पालखी मार्गावरील रोपांना ट्री गार्ड लावण्यासाठी ६७ लाख ५० हजार, उत्पादन शुल्क कार्यालयास प्रसाधन गृह बांधण्यासाठी २० लाख ३० हजार, मंगळवेढा नगरपरिषद शाळांमध्ये ई लर्निंग सुविधा बसविण्यासाठी २१.८१ लाख, उजनी डावा काल्यावर लोखंडी पूल बांधण्यास ८.२१ लाख, कुस्ती मॅट व कबड्डी मॅट देण्यासाठी ५९ लाख ५० हजार, मंगळवेढा तालुका क्रीडा संकुल येथे रात्रीच्या स्पर्धेसाठी टॉवर उभारण्यास ५२.३८ लाख,
जिल्हा उपनिबंधक कार्यालयात कॉम्पॅक्टर बसविण्यासाठी ३५.७२ लाख, जिल्हा परिषद शाळांना प्लास्टिक लॉकर पुरवठा करण्यास १ कोटी, पंढरपूर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील ऑपरेशन थिएटरसाठी १ कोटी २० लाख, तलाठी, मंडलाधिकारी यांना लॅपटॉप, प्रिंटर्स पुरवठा करणे ६० लाख तर तलाठी प्रशिक्षण केंद्रात सुविधेसाठी २० लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज