
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
कुमारी असल्याचे सांगून दोन मुलांच्या आईने पाचोरा तालुक्यातील तरुणासोबत लग्न केले. त्याच्याकडून एक लाख रुपये रोकड आणि १५ हजारांचे दागिने उकळले. हा प्रकार ३० जानेवारी २०१९ रोजी घडला. यात पतीने फसवणूक झाल्याची फिर्याद औरंगाबादच्या क्रांती चौक पोलिस ठाण्यात दिली.
या प्रकरणी अमोल रमेश देठेसह दोन महिलांविरुद्ध १२ फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी दोन दलाल महिलांना अटक झाली आहे.
पाचोरा तालुक्यातील श्रीराम विरभान पाटील यांच्या तक्रारीनुसार, त्यांची लग्न करण्याची इच्छा असल्यामुळे ते मुलीच्या शोधात होते.
दरम्यान, त्यांची औरंगाबादेतील अमोल रमेश देठे याच्याशी ओळख झाली. त्याला लग्नाबाबत सांगितले असता त्याने एका मुलीचे स्थळ असल्याचे पाटील यांना सांगितले. त्यानुसार, पाटील हे औरंगाबादेत आले. तेव्हा देठे आणि एका महिलेने सविता (नाव बदललेले आहे) हिची पाटीलसोबत ओळख करून दिली. पाटीलला सविता पसंद पडल्यानंतर त्यांचे लग्न ठरले. तेव्हा अनिताने कुमारी असल्याचे पाटील यांना सांगितले होते.
सविताची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक असल्याचे सांगून देठे आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेने पाटीलकडून एक लाख रुपये रोकड आणि अंदाजे पंधरा हजार रुपयांचे दागिने करून घेतले. तेच दागिने सविताला लग्नात घातले होते. त्यानंतर ३० जानेवारी २०१९ रोजी त्यांचा जळगाव येथे विवाह झाला होता. त्यानंतर आईची प्रकृती बिघडल्याचे सांगून सविता ही श्रीराम याला औरंगाबादला घेऊन आली. लघुशंकेचे नाव सागून ती गेली नंतर परत आलीच नाही. मात्र नंतर ती हरविली नसून स्वत:हून पळून गेली व तिला दोन मुले असल्याचे निष्पन्न झाले.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













