मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढातालुक्यातील आंधळगाव या गावातून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून संबंधित ठेकेदाराकडून बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचे उत्खणन सुरू असताना सुद्धा महसूल विभागाचे अधिकारी मात्र गांधारीच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी या प्रकरणी लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकातून होत आहे.
मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव हे गाव राष्ट्रीय महामार्गावर असून सध्या या गावातून माहामार्गाचे काम सुरू आहे. या कामासाठी संबंधित ठेकेदाराकडून मोठ्या प्रमाणात विना रायल्टी बेकायदेशीरपणे लक्ष्मीदहिवडी रस्त्यावरील पाझर तलावातून मुरूम उपसा होत आहे.
त्याकडे येथील तलाठी व मंडलाधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. गोरगरीब जनतेने गाडीभर वाळू अथवा मुरूम नेल्यास त्यांच्यावर पाचपट दंड करणारे अधिकारी मात्र या मोठ्या ठेकेदारावर कारवाई करण्याचे भान चिरीमिरीमुळे विसरून गेल्याने मुरमाचा बेसुमार उपसा होत असताना महसूल खाते कोमात गेले आहे.आंधळगाव येथील तलाठी व मंडलाधिकारी यांनी या मुरुम उपशाकडे अर्थपुर्ण दुर्लक्ष केले असून ते दहा ते पंधरा दिवस गावाकडे फिरकत नसून दोघांनाही आंधळगाव येथे सुसज्ज कार्यालय असताना त्यांनी मंगळवेढा खाजगी खोल्या घेऊन तिथे कारभार थाटला आहे. त्यामुळे नागरिकांना दाखले उतारे यावर सह्या घेण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज