mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

ऐन उन्हाळ्यात नागरिकांना लोडशेडिंगचा शॉक

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
ऐन उन्हाळ्यात नागरिकांना लोडशेडिंगचा शॉक



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

राज्याची वीज उत्पादक कंपनी महाजेनकोतर्फे नागरिकांसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. १०१७० मेगावॅट वीज उत्पादन क्षमता असलेल्या विद्युत केंद्रात सध्या केवळ ७४१६ मेगावॅट विजेचे उत्पादन होत आहे. दुसरीकडे फेब्रुवारीत विजेची मागणी सातत्याने २१ हजार मेगावॅटच्या स्तरापर्यंत पोहचत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात नागरिकांना वीज संकटाचा सामना करावा लागेल, अशी स्थिती दिसून येत आहे.



गत बुधवारी राज्यात विजेची मागणी थेट २१५७० मेगावॅटच्या विक्रमी स्तरावर पोहचली.यापूर्वी २३ आॅक्टोबर २०१८ ला २०७४५ मेगावॅट मागणीचा रेकार्ड नोंदविण्यात आला होता. फेब्रुवारीमध्ये नोंदविलेल्या मागणीचा विचार करता यावर्षी ३३२० मेगावॅटपेक्षा अधिक मागणी राहिली, जी १८ टक्के अधिक आहे. शनिवारी दुपारी १२ वाजता २१,३९२ मेगावॅटची मागणी नोंदविण्यात आली. महावितरणने केंद्रासह खासगी संयंत्राच्या भरवशावर ही वाढलेली मागणी पूर्ण करून स्वत:ची पाठ थोपाटून घेतली असली तरी उन्हाळ्यात विजेची मागणी २५ हजार मेगावॅटच्यावर गेल्यास राज्यात भारनियमन लागू करण्याशिवाय पर्याय उरणार नाही.



एनटीपीसी आणि एनपीसीआयएल यांच्याकडून ४१३४ मेगावॅट वीज घेण्यात आली आहे. याशिवाय अदानी पॉवर, रतन इंडिया, सीजीपीएल, जेएसडब्ल्यू, एम्को आदी खासगी कंपन्यांकडून ४५६७ मेगावॅट वीज घेतल्याने राज्यात भारनियमनाची गरज पडली नाही. मात्र वाढत्या मागणीने महावितरणचे अधिकारी चिंतेत पडल्याची माहिती सूत्रांनी दिली.



दुसरीकडे महाजेनकोच्या अनेक केंद्रावर संकट निर्माण झाले आहे. उत्पादन खर्च वाढल्याने त्यांना बंद ठेवण्यात आले आहे. यामध्ये भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राच्या युनिट ३ सह नाशिक व परळी येथील युनिटचा समावेश आहे. चंद्रपूरची युनिट क्रमांक ५ आणि ६ आधीच बंद आहेत आणि कोराडीच्या युनिट क्रमांक ६ आणि ७ ची स्थितीसुद्धा सारखीच आहे. अशा परिस्थितीत मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणला खासगी संयंत्राचा आधार घ्यावा लागत आहे.



बंद युनिट सुरू करणार, कोयना सोलरचा आधार



महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीतर्फे लोड मॅनेजमेंटच्या माध्यमातून उन्हाळ््यातील वाढती मागणी पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जातील. यासाठी महाजेनकोचे बंद पडलेले युनिट सुरू करण्यास सांगण्यात आले आहे. रतन इंडियाच्या बंद पडलेल्या १०८० मेगावॅटचे संयंत्र सुरू करण्यात येईल. कोयना धरणात मुबलक पाणी असल्याने तेथे जल विद्युतचे उत्पादन वाढवून संकटाचा सामना करण्यात येईल.

जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsMaharashtra Maza

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
प्रहारच्या तुषार पुंडकर हत्येप्रकरणी दोघांना अटक,आज अकोट बंद

प्रहारच्या तुषार पुंडकर हत्येप्रकरणी दोघांना अटक,आज अकोट बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

बळीराजासाठी आनंदाची बातमी! उजनीतून कालवा आणि बोगद्याद्वारे पाणी सोडण्यास सुरुवात; ‘एवढ्या’ लाभक्षेत्राला पाणी मिळणार; ‘या’ अखेरपर्यंत पाणी चालू राहणार

March 19, 2026
मंगळवेढ्यात ‘बालाजी कन्स्ट्रक्शन ॲन्ड बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्स’ आजपासून सुरु; ग्राहकांना एकाच छताखाली मिळणार सर्व दर्जेदार साहित्य

मंगळवेढ्यात ‘बालाजी कन्स्ट्रक्शन ॲन्ड बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्स’ आजपासून सुरु; ग्राहकांना एकाच छताखाली मिळणार सर्व दर्जेदार साहित्य

March 19, 2026
नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

March 19, 2026
शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

March 19, 2026
वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

March 19, 2026
राजमाता अर्बन बँक रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; दामाजी चौकात बँकेची 24 तास ATM सेवा सुरू

मंगळवेढ्यात ‘राजमाता बँकेचा’ उद्या वर्धापनदिन; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चहापानाचे आयोजन

March 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा