मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
दीड लाख रूपयांची लाच घेताना जयसिंगपूर (ता. शिरोळ) येथील मंडळ अधिकार्यासह त्याच्या पंटरला लाचलुचपत विधभागाने रंगेहाथ पकडले आहे. आयुबखान दस्तगीर देसाई, (वय 54) असे लाचलुचपत विभागाने पकडलेल्या मंडळ अधिकार्याचे नाव आहे तर, अमोल प्रशांत कोळी (वय 32) असे त्याच्या पंटरचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, क्रारदार यांची शेती असून त्यातील पाचशे ब्रास माती त्यांना वीट भट्टीसाठी विकायची होती. त्यासाठी रॉयल्टी काढायची असल्याने त्यांनी तहसील कार्यालयात अर्ज केला होता.
या शेतीच्या मातीचा पंचनामा करून योग्य अहवाल तहसीलदार शिरोळ यांना सादर करण्यासाठी देसाईने त्यांच्याकडे एक लाख साठ हजरा रूपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रादार यांनी याबाबत लाचलुचपत विभागाला माहिती दिली. माहितीची खातरजमा करून लाचलुचपत विभागाने सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम घेताना देसाईसह त्याच्या पंटरला रंगेहाथ पकडले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज