मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा येथील पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरिक्षक व पोलिस हवालदार हे शासकिय कामकाज करीत असताना बोराळे येथील प्रमोद यशवंत पाटील याने शिवीगाळ व बघून घेण्याची धमकी देवून दैनंदिन कामकाजाची कागदपत्रे अंगावर भिरकावून मोबाईल तोंडावर फेकून मारल्याप्रकरणी पाटील यांचेविरूध्द शासकिय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सविस्तर हकिकत अशी, १३ रोजी सकाळी ११ वा .फिर्यादी तथा बोराळे बीटचे हवालदार सुनिल गायकवाड व पोलिस उपनिरिक्षक दत्तात्रय पुजारी हे पोलिस ठाण्यातील अधिकारी कक्षात दैनंदिन शासकिय कामकाज करत होते .
यावेळी तक्रारदार लक्ष्मण अशोक माने व त्याचा भाऊ हणमंत माने यास आरोपी प्रमोद पाटील हे शिवीगाळ व दमदाटी अधिकारी कक्षात करत असताना त्यास तुमची काय तक्रार असेल तर रितसर नोंदवा असे म्हणताच , पोलिस उपनिरिक्षक पुजारी यांच्या टेबलवर ठेवलेले दैनंदिन कामकाजाची कागदपत्रे उचलून ती त्यांच्या अंगावर टाकली .
तसेच मोबाईल फिर्यादीच्या तोंडावर फेकून मारला . आरोपीस पकडत असताना कन्नड व मराठी भाषेतून पोलिस उपनिरिक्षक पुजारी , फिर्यादी सुनिल गायकवाड यांना तसेच अशोक माने , भाऊ माने आदींना शिवीगाळ करून बघून घेण्याची धमकी दिल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे . अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक बामणे हे करीत आहेत .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज