मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी येथील अनिल शिवदास शिंदे हा युवक रहाते घरातून अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या पत्नीने मंगळवेढा पोलिसात दिली आहे.
अनिल शिवदास शिंदे (वय ३५ रा . म्हसोबा वस्ती ,लक्ष्मी दहिवडी ता . मंगळवेढा) हा इसम २३ जून रोजी सकाळी ९ च्या सुमारास रहाते घरातून गावातून येतो असे सांगून निघून गेला तो परत आलाच नाही.त्याचा सर्वत्र शोध घेतला मात्र तो मिळून न आल्याने त्याची पत्नी सुरेखा हिने मंगळवेढा पोलिसात तक्रार नोंदविली.
सदर इसमाची उंची १६५ सेमी , रंग काळासावळ , अंगाने सडपातळ , नाक सरळ , चेहरा उभट , अंगात काळ्या रंगाची पॅट व पांढरा शर्ट परिधान केला असून त्याचे शिक्षण ११ वी झाले आहे . व त्याला मराठी भाषा बोलता येते .
सदर वर्णनाचा इसम कोणास आढळल्यास त्यांनी मंगळवेढा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज