मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मागच्या महिन्यापर्यंत केवळ चीन पुरता मर्यादित असलेला कोरोना व्हायरस आता जगभरातील जवळपास ८१ देशांमध्ये पोहचला आहे. संपूर्ण जगात थैमान घातलेल्या या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 3200 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाबतच्या जनजागृतीसाठी मोठ्या प्रमाणावर मोहिम हाती घेण्यात आली असून शाळा, सार्वजनिक ठिकाणे, रेल्वे आणि बसस्थानक या ठिकाणी पोस्टर्स, बॅनर्स लावण्यात येणार आहेत.
‘राज्य शासनाने पुरेशी खबरदारी घेतली आहे. नागरिकांनी घाबरु नका तसेच नागरिकांनी मास्क घालून फिरण्याची गरज नाही. जे नागरिक विमानतळ किंवा रुग्णालयात काम करतात. त्यांनी हे मास्क घालण्याची गरज आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार देखील आता चांगलच जागरूक झालेले दिसून येत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने जे काही लागतील त्या सर्व उपाययोजना करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासन करताना दिसून येत आहे.
नागरिकांनी घाबरून जाण्याचे काहीही करण नाही, सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळावी. होळीचा सण साजरा करताना त्याचे स्वरुप मर्यादित ठेवावे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी पत्रकार परिषेदेत सांगितले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज