

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील मुंढेवाडी येथील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयांनी तब्बल ५९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814

याबाबत अधिक माहिती अशी की , मुंढेवाडी येथील यशवंत बाबूराव पाटील (वय ७३) यांच्या बंद घरात १० डिसेंबर रोजी सकाळी १०.०० ते १८ डिसेंबर रोजी सकाळी ७.०० चे दरम्यान अज्ञात चोरटयाने कुलूप तोडून घरात प्रवेश केला व घरातील लोखंडी कपाट उचकटून रोख रक्कम ३५ हजार रुपये , सोन्याचे दागिने , १५ साडया असा एकूण ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला अशी फिर्याद यशवंत पाटील यांनी पोलिसांत दिली असून अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.








बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













