मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा येथील धर्मगाव रोडवरील दग्र्याचे ८ हजार २०० रुपये किमतीचे पितळी पाच कळस चोरट्यांनी चोरून नेले असून याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान , सध्या ग्रामीण व शहरी भागात चो – यांची मालिका सुरु असून चोरट्यांनी आता दग्र्यावरील कळसालाही टार्गेट केल्याने देवही चोरांच्या तावडीतून सुटू शकले नाहीत .
मंगळवेढा शहरालगत धर्मगाव रस्ता असून रत्नपारखी यांचे मळयात राजेबागसवार जलालोद्दीन दर्गा असून या दग्र्याच्यावर पाच पितळी कळस होते . दि . ११ ते १८ जुलैच्या दरम्यान अज्ञात चोरटयाने ८ हजार २०० रुपये किमतीचे दग्र्यावरील कळस चोरून नेल्याची फिर्याद जलाल जैनुद्दीन मुल्ला ( दरवाजकर ) यांनी दिली असून अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान , गेल्या दोन महिन्यापासून चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे . मागील आठवड्यात कचरेवाडी परिसरातील लक्ष्मी नगर येथे एकाच रात्री दोन घरे फोडून सोन्याच्या दागिन्यावर चोरटयांनी डल्ला मारला . मागील दोन दिवसापुर्वी ब्रम्हपुरी येथे चोरटयांनी गावाच्या बाहेर असलेल्या वसाहतीमध्ये प्रवेश करून चोरी करण्याचा प्रयत्न केला . मात्र घरातील सदस्य जागे झाल्यामुळे चोरट्यांनी धूम ठोकली . चोरीचे सत्र अद्यापही अखंडीत सुरु आहे . चोरीचे गुन्हे पोलिसांत दाखल होतात . मात्र एकही चोरटा आत्तापर्यंत पोलिसांना पकडण्यात यश आले नाही . त्यामुळे पोलिसांपेक्षा चोरटेच प्रबळ होत असल्याची चर्चा नागरिकांतून सुरु आहे .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज