मंगळवेढा: समाधान फुगारे
मंगळवेढा-पंढरपूर या माझ्या मतदारसंघातील जनता हाच माझा पक्ष असल्याचे मत आमदार भारत भालके यांनी विचार विनिमय बैठकीत व्यक्त केले आहे.
व्यासपीठावर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ.भालके पुढे बोलताना म्हणाले की,अपेक्षित असलेली कामे अपूर्ण आहेत.येणाऱ्या काळात ही सर्व कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
जनता बरोबर असताना मला कोणीही हरवू शकत नाही.शेतीच्या पाण्याचा प्रश्न महाराष्ट्रात गाजवला.गेल्या पाच वर्षात अनेक योजना मंजूर करून अस्तित्वात आणल्या आहेत.३५ गावाचा पाणी प्रश्न हा कोर्टातून आपण विजय मिळवला.
३५ गावाच्या शेतात पाणी पाहिल्याशिवाय गप्प बसणार नाही. या योजने बाबत काही लोकांनी दिशाभुल केली आहे.कोण खऱ्या अर्थाने काम करते कोण नुसत्या गप्पा मारताय हे जनतेला माहितेय.बसवेश्वर व चोखामेळा स्मारकासाठी प्रयत्न सुरु आहे.
विकास करत असताना सुडाचे राजकारण केले नाही.कुणाला लुबाडले नाही कुणाकडून वर्गणी घेतली नाही.जात पात गट तट न पाहता लोकांची कामे केली.
एकाद्या कामात मदत करायची होत नसेल तर ते काम अडवू नका असे भावनिक आव्हान देखील त्यांनी विरोधकांना केले.कुणाच्या दबावाखाली जाऊन मी काम करणारा आमदार नाही.
ग्रामीण भागातील मुलींसाठी शहरात स्वतंत्र वसतिगृह आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवत असताना काही महिलांनी मला सांगितले आमच्या डोक्यावरची घागर बंद कर आम्ही विसरणार नाही.येणाऱ्या काळात वाड्यावस्त्यावर पाणी पोहचण्यासाठी काम सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज