mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढा पोलिसांनी कारवाई न करताच सोडले जनावरांचे वाहन;चौकशीची मागणी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
मंगळवेढा पोलिसांनी कारवाई न करताच सोडले जनावरांचे वाहन;चौकशीची मागणी

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढयातून अवैधरित्या जनावरे वाहतूक करणारा जनावरांचा टेंपोवर कारवाई न करता शनिवारी मध्यरात्री सोडून देण्याचा प्रकार मंगळवेढा पोलिसांकडून घडला असून जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814


 शनिवारी मध्यरात्री कर्नाटक राज्याकडे जाणाऱ्या एका टेंपोत दाटीवाटीने खिलार गाई भरून दाव्याने करकचून बांधून जात असल्याची माहिती तहसीलदार यांना समजली.तहसीलदार यांनी याबाबत पोलिसांना चौकशी करण्याचे कळविले.

 या वाहनामध्ये दाटीवाटीने जवळपास चार खिलार गायी व एक खोंड असे दाव्याने करकचून बांधण्यात आले होते तहसीलदारांनी कळविताच पोलिस मरवडे मार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ जावून त्यांनी सदर जनावरे घेवून जाणाऱ्या जनावरांची चौकशी केली.व त्यांनी ही जनावरे कर्नाटकातील मौजे टाकळी ,ता.इंडी येथे ऊस तोडणीसाठी कामगार घेवून जात असल्याची नोंद स्टेशन डायरीला घेतली आहे. टेंपोतील या जनावरांची हालअपेष्टा झाल्याची तक्रार गोरक्षकांची आहे. 

तहसीलदार यांनी कळवूनही पोलिसांच्या नातेवाईकांचा वाहतुक करणारी जनावरे व वाहन असल्यामुळे पोलिसांनी कुठलीही कारवाई न करता केवळ स्टेशन डायरीला नोंद करून पोलिसांच्या नातेवाईकांना वाचविण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा शनिवारी दिवसभर मंगळवेढा शहरातून होत होती.या वाहनाला जनावरांची वाहतूक करण्याचा कुठलाही परवाना नसल्याचे तसेच ही जनावरे कर्नाटक राज्यात कत्तलखान्याकडे जात असल्याचा आरोप गोरक्षकांचा आहे.

कर्नाटकातील कत्तलखान्याकडे मंगळवेढयातून खिलार गाईंचे वाहन जात असल्याचे गोरक्षकांनी भ्रमणध्वनीवरून सांगितले.हा प्रकार अतिशय चीड आणणारा असून एकीकडे शासन गोहत्या बंदी आणून मुक्या जनावरांचे जीव वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना येथे पोलिसांच्या नातेवाईकांची जनावरे असल्यामुळे सदर वाहन कुठलीही कारवाई न करता सोडून देणे म्हणजे गोहत्येला पाठबळ दिल्यासारखेच आहे.वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी यात तातडीने लक्ष घालून सखोल चौकशी करावी व दोषींविरूध्द कडक कारवाई करावी.- शशिकांत चव्हाण,जिल्हा उपाध्यक्ष,भारतीय जनता पार्टी .

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
ऊसाची पहिली उचल जाहीर करा अन्यथा आंदोलन अटळ : सचिन पाटील

ऊसाची पहिली उचल जाहीर करा अन्यथा आंदोलन अटळ : सचिन पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भजन आणि कीर्तनाच्या गजरात खुपसंगी येथे कै.सीताराम सलगर व कै.भामाबाई सलगर यांचा १५ वा पुण्यस्मरण सोहळा संपन्न होणार

भजन आणि कीर्तनाच्या गजरात खुपसंगी येथे कै.सीताराम सलगर व कै.भामाबाई सलगर यांचा १५ वा पुण्यस्मरण सोहळा संपन्न होणार

April 22, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

हेलपाटे वाचणार! जमिन NA करण्यासाठी आता सोपी, जलद ऑनलाइन प्रणाली सुरु; बीपीएमएस प्रणालीचे महसुलीमंत्री बावनकुळेंच्या हस्ते लोकार्पण

April 22, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

उन्हाळ्यात पावसाळा! नागरिकांसाठी सूचना जारी; ‘हे’ जिल्हे आज ‘यलो अलर्ट’वर; ‘या’ दिवसापर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता

April 22, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

नागरिकांनो! गॅस सिलिंडरसाठी आता नवा नियम, हा नंबर नसेल तर सिलिंडर मिळणारच नाही; वाचा काय गरजेचं?

April 22, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

भावा-भावातील वाद विकोपाला! मंगळवेढ्यात शेतीच्या वादातून तुफान हाणामारी; संतापलेल्या भावाचा थेट डोक्यात प्रहार

April 22, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

द्राक्ष बागायतदारांनो सावधान! तोतया पोलीस फिरतायत तुमच्या मागावर; मंगळवेढ्यात तोतया पोलिसांचा सुळसुळाट; तपासणीच्या बहाण्याने चालकाच्या डोळ्यादेखत रक्कम लंपास

April 22, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा