मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
आजारी आईला भेटण्यासाठी गेलेल्या महिलेच्या भावानेच तिच्या घरामध्ये चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी पाच वाजता महमदवाडी येथे घडली. रोख रक्कम, मोबाईल, एटीएम कार्ड असा 42 हजार रुपयांचा ऐवज चोरणाऱ्या भावाला वानवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
नितीन शिवाजी भाकरे (वय 35, रा. टाकळी हाजी, माळवाडी, शिरूर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 37 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी आई आजारी असल्यामुळे रविवारी त्यांच्या आईला भेटण्यासाठी तिच्या घरी गेल्या होत्या. त्या वेळी फिर्यादीच्या घरी त्यांचा सख्खा भाऊ व त्याच्यासमवेत एक महिला आली होती.
त्या वेळी फिर्यादी घरी नव्हत्या. त्यामुळे आरोपीने त्यांच्या घरातील 37 हजार 500 रुपयांची रोख रक्कम, मोबाईल, घरातील चाव्या, एटीएम कार्ड असा 42 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. फिर्यादी घरी परतल्यानंतर त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यास अटक केली. या प्रकरणाचा तपास महिला पोलिस कर्मचारी सुरेखा साबळे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज