मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
भरधाव टिप्परच्या धडकेने केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करणाऱ्या दुचाकीस्वार कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास होटगी रोडवरील गैबीपीर दर्गाह परिसरात घडली.
आय. जे. कांबळे (रा. पंकज सोसायटी, अंत्रोळीकर नगर परिसर, सोलापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कांबळे हे केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या जीएसटी कार्यालयातून सेवानिवृत्त झाले होते. सेवानिवृत्तीनंतर कांबळे हे याच कार्यालयात कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर टपाल टपाल वाटपाचे काम करत होते.
मंगळवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास होटगी रोडवरुन घराच्या दिशेने जाताना भरधाव टिपरने कांबळे यांच्या दुचाकीला धडक दिली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज