मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
सोलापूर येथे आज बुधवार, दि. 12 फेब्रुवारी रोजी सोलापूर शहरासाठी त्वरीत रिंगरुट होण्याकरीता व सोलापूर-अक्कलकोट महामार्गावरील कोंडा नगर झोपडपट्टी रहिवाशांचे पुनर्वसन करण्यासंदर्भात आमदार प्रणिती शिंदे यांनी मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठकीचे आयोजन केले होते.
सोलापूर शहरातून होणाऱ्या जड वाहतूकीमुळे अनेक अपघात होत आहेत. ही जड वाहतूक शहरातून कायमस्वरूपी बंद व्हावी यासाठी रिंगरुट संदर्भात आयोजित बैठकीत मा. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर,सोमपा आयुक्त दिपक तावरे साो. तसेच प्रकल्प संचालक – राष्ट्रीय महामार्ग संजय कदम यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली.
त्यानंतर सदर रिंगरुटसाठी केंद्र व राज्य शासनाकडे तात्काळ पाठपुरावा करण्याचे या बैठकीत ठरले आहे. तसेच सोलापूर-अक्कलकोट महामार्गावरील कोंडा नगर झोपडपट्टी रहिवाश्यांचे पुनर्वसन करण्यासंदर्भात शासकीय पुनर्वसन योजनेतून त्यांना घर देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे या बैठकीत ठरले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज